सोलापूर : नुकत्याच गोवा येथे फिसाफ इंडिया फेडरेशन कप एरोबिक्स अँड हिपहॉप नॅशनल चॅम्पियनशिप 2025 पार पडल्या. या स्पर्धांमधून सुवर्णपदक विजेते स्ट्रीम लाईन अकॅडमीचे स्वरा गनेर वृंदा बोधूल जुई जोशी, त्रिगुणा यावनपल्ली , अनुष्का चव्हाण, हीर गाला या ॲथलेट्सची दुबई येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फेडरेशन कप 2025 साठी निवड झाली आहे. गोवा येथील राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत भारतातील 18 राज्यातील ३७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये भरघोस मेडल्सची कमाई करत महाराष्ट्राचा संघ प्रथम क्रमांकावर विजयी झाला. दिल्ली द्वितीय तर तृतीय स्थानावर तमिळनाडू ने आपले नाव नोंदविले.
विविध प्रकारात व विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सोलापूर मधील स्ट्रीमलाईन अकॅडमीच्या डॉक्टर मोहिनी मोरे ताकते यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 11 अथलेट्स चा संघ या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत खेळला. या संघात वृंदा बद्दल स्वरा गनेर, शौर्य साळुंखे, पर्युल दोषी, त्रिगुणा यावनपल्ली, जुई जोशी, जान्हवी ढोले, ध्रुव वाघमारे, वीरांश भंडारी, अनुष्का चव्हाण व हीर गाला यांचा सहभाग होता. या स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात वृंदा बद्दल व स्वरा गनेर या जोडीने सुवर्णपदक ११ वर्षाखालील गटात जुई जोशी व त्रिगुणा यांनी सुवर्णपदक तर सात वर्षाखालील वयोगटात हिर गाला व अनुष्का चव्हाण या जोडीने सुवर्णपदक मिळवले व दुबई येथे होणाऱ्या एशियन फेडरेशन कप 2025 साठी होणाऱ्या स्पर्धेमध्ये स्थान मिळवले.
त्यांच्या या यशाबद्दल व दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.