जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यते नंतर आता ही खबरदारी घेतली जाते आहे. राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून हल्ले होण्याची देखील शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पुलवामा नंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आता जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे.