महाराष्ट्र सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, पुणे (बार्टी), मुंबई विद्यापीठ, सोसायटी ऑफ ग्रेज इन, युके एस ओ ए एस आंबेडकर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जागतिक दृष्टिकोन न्याय समता आणि लोकशाहीची पुनर्कल्पना या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 29 ते 25 एप्रिल 25 रोजी लंडन या ठिकाणी संपन्न झाली या परिषदेस महाराष्ट्र राज्याचा माजी मंत्री म्हणून मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते. या परिषदेच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जागतिक स्तरावरील विचाराचा प्रभाव आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून जागतिक मानवी कल्याणाच्या विकासासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून या परिषदेकडे पाहिले जाईल. त्यांचे न्याय, समानता आणि लोकशाही या क्षेत्रातील योगदान अमूल्य राहिलेले आहे. या परिषदेला देश-विदेशातील विविध मान्यवरानी हजेरी लावली होती.
त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ, इंग्लंड मधील केंद्रीय संसदीय राज्यमंत्री एल मुरुगन, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, युके येथील भारतीय उच्चायुक्त विक्रम कुमार दोराईस्वामी, यांच्याबरोबर लंडन येथील जगातील नामांकित विद्वान व्यक्तीनी सहभाग नोंदवला त्यामध्ये प्रोफेसर डेव्हिड मोसे (युके), प्रोफेसर जयसिलान राज (किंग्स कॉलेज लंडन) डॉ. रूथ कट्टूमुरी (लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) आणि प्रोफेसर लुबा बलगोवा (युके) यांचा सहभाग होता ही परिपद यशस्वी करण्यासाठी आजीवन अध्यन आणि विस्तार विभाग मुंबई संचालक प्रा. डॉ बळीराम गायकवाड यांनी समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली.