युवा पिढीला भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण पध्दतींचा प्रचार व प्रसार करणे, युवा पिढील व्यसनापासून व मोबाईलचा अति वापरापासून लांब ठेवणे, युवा पिढी योगाच्या माध्यमातून आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी इ. वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी पुज्य स्वामी आदित्यदेवजी ३ दिवसाच्या मुक्कामी सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रवास करणार आहेत.
बुधवार दिनांक ७ मे रोजी पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेमध्ये शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या समोरील मैदानात नागरिकांसाठी स्वामीजी योगशिबीराच्या माध्यमातून योगाचे धडे देतील. त्यानंतर सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेमध्ये पंढरपूर येथे रखुमाई सभागृह येथे युवकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी सायंकाळी ठीक ४.३० वा. मंगळवेढा येथील इंग्लिश स्कुल, बस स्टॉपसमोर यशवंत मैदान विद्यार्थी, युवकांशी व नागरिकांशी संवाद साधतील.
गुरुवार ८ मे रोजी पहाटे ५.३० ते ७.३० शेळगी येथे शिबीर त्यानंतर १०.३० ते १२.३० लोकमंगल कॉलेज, वडाळा येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील