सोलापूर : गवळी समाज सोलापूर भव्य अकरावा सामुदायिक विवाह सोहळा समिती तर्फे दि. ५ मे २०२५ रोजी सोमवार सार्य ७.०० मि गोरज मुहुर्तावर स्थळ : जुनि मिल कंपाऊड येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
परम्सद्गुरु श्री सिदाजीअप्पा प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित गवळी समाज सोलापूर तर्फे या आदर्श सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, वाढती महागाई व दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर असंख्य गरजु वधुवर पित्यांना सर्व अर्थाने दिलासा देणारा हा अनुकरणीय असा आदर्श सामाजिक उपक्रम अभिनंदनिय ठरतो.
महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा या भागातील समाज बांधवाची मोठी सोय यामुळे झाली आहे. वर्ष २००२ पासुन ते २०२३ पर्यंत म्हणजेच २१ वर्षात तब्बल ४९२ जोडप्याचे शुभमंगल या चळवळीच्या माध्यमातून संपन्न झाले आहे. २००२ पासुन प्रति दोन वर्षातून एकदा या प्रमाणे यापुर्वी एकुण दहा वेळा सोलापूर शहरात हे सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीपणे संपन्न झाले आहेत.