पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIA च्या सूत्रांमार्फत समजतंय. NIA च्या अहवालात पाकविरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आला असून लवकरच हा अहवाल केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. 26 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूमुळे फक्त भारतच नव्हे तर अख्खं जग हळहळलं. या हल्ल्याचा तपास NIA कडून करण्यात येत असून त्याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIA च्या सूत्रांमार्फत समजतंय. NIA च्या अहवालात पाकविरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आला आहे.
या अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती असल्याचे समोर आलं आहे. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्रं लपवली होती असंही तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी तब्बल दीडशे जणांची चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळी मिळालेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. NIA हा अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सादर करणार आहे.
पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे. या मध्ये पाकिस्तानविरोधातील सर्व पुरावे सापडल्याचे नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तानी आर्मी, लष्कर आणि इतर दहशतवादी संघटना त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहेत.
कुठे लपवली शस्त्रं ? त्याचसोबत हल्ला करणारे दहशतवादी हे बैसरन व्हॅलीमध्ये नेमके कसे आले, पहलगामपर्यंत ते कसे पोहोचले, त्यांनी कोण-कोणत्या मार्गांचा वापर केला तसेच त्यांनी जिथे शस्त्र लपवली त्या ठिकाणाचा उल्लेखही एनआयएच्या अहवालात करण्यात आला आहे. निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये सर्व शस्त्रास्त्रं लपवून ठेवली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.योग्य ठिकाणांचा वापर करत दहशतवादी पहलगामच्या बैसरन व्हॅलीत पोहोचले आणि मंगळवारी दुपारी त्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत त्यांना लक्ष्य केले. मात्र या सगळ्या तपासादरम्यान, OGW ( on ground worker) या दहशतवादी संघटनेची सगळी जी काही सूत्रं आहेत ती कशा पद्धतीने ऑपरेट होत होती, ते दहशतवादी हँडलरच्या संपर्कात कशा पद्धतीने होते, या सगळ्या मुद्यांचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केलेला आहे. हा रिपोर्ट आता गृहमंत्रायलकडेही सादर करण्यात येणार आहे. मात्र या हा रिपोर्ट तयार करत असताना पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला, तिथे वेगवेगळी आधुनिक यंत्रणांचा वापर करून एनआयने गेल्या काही दिवसांत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी आर्मी आणि तेथील दहशतवादी संघटना कशा पद्धतीने या दहशतवाद्यांना ऑपरेट करत होत्या, या सगळ्याचे पुरावे या प्राथमिक रिपोर्टमध्ये आहेत. येत्या काळात भारत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.