सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी च्या उपमुख्य तांत्रिक अधिकारी पदावर सुरुवातीपासून कार्यरत असणाऱ्या तपन डंके यांची महापालिका आयुक्तांनी उचलबांगडी केली आहे. त्यांच्या बदलीबाबत महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मे महिन्यात ऑर्डर काढली होती मात्र डंके जाण्यास तयार नव्हते अखेर आज त्यांना स्मार्ट सिटी कंपनी मधून काढले असून त्यांना झोन एकचे अधिकारी करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेमध्ये आजवर जी कामे केली त्यामध्ये अनेक तांत्रिक चुका असून या सर्व बाबींची चौकशी करून सुरुवातीपासून स्मार्ट सिटी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. आजवर केलेली स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यावधी रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यामुळे या कामांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेतील सल्लागार कंपन्यांनी कोट्यावधी रुपये फी घेऊन चुकीचा सल्ला दिला, त्याचप्रमाणे डंकेसह काही अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच तांत्रिक बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यावधी रुपये खर्चून निकृष्ट कामे करणाऱ्या डंके यांची आता चौकशी होणे गरजेचे आहे.येस न्यूज मराठी ने सुरुवातीपासूनच शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या अनेक चुकांवर बोट ठेवले आहे.