300 महिलांच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष
सोलापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरच्या वतीने के एल ई स्कुल च्या मैदानावर भगवान परशुराम महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी सवाद्य मिरवणुक काढत भगवान परशुरामांची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली. यावेळी मूर्तिचे पूजन ब्राम्हण समाजाचे नेते प्रा काकासाहेब कुलकर्णी, अमोल जोशी, स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, अध्यक्ष सुधीर कुलकर्णी महिला अध्यक्षा सायली जोशी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अनुजा ताई कुलकर्णी, युवा नेते संकेत किल्लेदार यांच्या हस्ते करत मिरवणूकिस प्रारंभ झाला.

जय परशुराम या जयघोषचा निनाद करत बाल, महिला, आबलवृद्ध हाजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर मिरवणूक के एल ई स्कुल, गोविंदश्री मंगल कार्यालंय, डी मार्ट व पुन्हा के एल ई स्कुल अश्या मार्गवर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी 300 महिलांचे लेझीम पथक हे विशेष आकर्षण होते.
याच बरोबर 50 लोकांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला.

यांनंतर पंकज कुलकर्णी यांच्या पौरोहित्या खाली परशुराम महाराजाची स्थापना करण्यात आली. यावेळी डाळ पन्हे यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी ऍड शर्वरी रानडे, अरुण कुलकर्णी, विक्रम डोनसाळे, दैदिप्य वढापूरकर, कपिल कुलकर्णी, योगेंद्र पूजारी, रवींद्र नाशिककर, अनिता कुलकर्णी,आदी उपस्थित होते.