(श्रीशैल गवंडी, दि. २९/०४/२०२५) अ.कोट
श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील श्री वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न वातावरण आपणास नेहमीच प्रफ्फुलीत वाटते. या प्रसन्न वातावरणामुळे मनात स्वामीमय भक्तीचा आनंद सागर तरळतो, त्यामुळे स्वामी दर्शनाची आस नेहमी लागणे साहजिकच आहे. अशा या स्वामी समर्थांच्या जागृत स्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरास भाविकांनी वेळोवेळी भेट देऊन नेहमीच स्वामी दर्शन घेऊन वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नतेचा भाविकांनी नेहमी लाभ घ्यावा असे मनोगत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक प्रौद्योगिक मंत्री व बांद्रा मुंबई विधानसभा मतदार संघाचे आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी आ.आशिष शेलार यांचा सपत्निक स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी आ.आशिष शेलार बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, नरेंद्र हेटे, अमेय हेटे, मंजिरी हेटे, मा.नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, नन्नू कोरबू, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, अविनाश क्षीरसागर,
प्रसाद सोनार, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.