“पीक विमा योजना आपण चालवत होतो. त्यामध्ये आल्याला अनेक घोटाळा पाहायला मिळाले. आपण मागच्या वेळेस 1 रुपया पीक विमा योजना सुरु केल्यानंतर लाखो बोगस अर्ज आपल्याला पाहायला मिळाले. हजारो कोटींचा अपव्यय होतो आहे अशाप्रकारचं षडयंत्र लोकांनी केलं. त्यामुळे गरजू शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये त्या पद्धतीने सुधारित पद्धतीने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन विमा कंपन्यांचा लाभ नाही तर शेतकऱ्यांचा लाभ झाला पाहिजे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात गुंतवणूक करणं, शेतकऱ्यांना विविध आश्यक गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.