सोलापूर –प्रभाग क्रमांक 10 E,F2 ग्रूप लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल येथे दूषित पाणी येत असल्याने व सदर ठिकाणी हे पाणी कुठून मिसळत होते यावर इकडील कार्यालयाकडून शोध सुरू होता तथापि त्याचा उलगडा होणे स विलंब होत होता नागरिकांची वाढती नाराजी लक्षात घेवून मा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी रोबो कॅमेरा मशीन व मॅन्युअल कॅमेरा मशीन ने शहरातील अश्या सर्व ठिकाणी शोध मोहीम घेऊन त्यावर उपाय योजना करणे कामी निर्णय घेऊन अश्या प्रकारची मशीन पुरवणारे व्हेंडर्स यांना डेमो घेऊन पाईप लाईन ची तपासणी करणे चे सार्व आरोग्य अभियंता कार्यालयास व सर्व विभागीय कार्यालयास आदेशित केले होते त्या अनुषंगाने दि.21.04.2025 ते 24.04.2025 अन्वये हा डेमो पार पडला आहे सदर डेमो सुरू असताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच अतिरिक्त श्री.संदीप कारंजे, उपअभियंता तपन डंके यांनी जागेवर पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले होते.त्यास अनुसरून उपरोक्त ठिकाणी विभागीय कार्यालय कडून एरिका कंपनी चे कॅमेरा चे साह्याने दूषित पाणी चे उगमस्थान /लोकेशन ट्रेस करून त्या ठिकाणी कुजलेले सडलेले जुने पाईप काढून नवीन पाच पाइप टाकून अनुक्रमे ६” व ४” व्यासाचे दोन वॉशआउट व्हॉल्व बसविणेत आलेले आहे.

आज दिनांक 26.04.2025 रोजी सदर ठिकाणी पाणी पुरवठा सकाळी 9.00 वाजता सुरू झाला आहे सदर ठिकाणी पुनश्च एकदा वॉशआउट घेणेत आले नंतर घरोघरी जाऊन पाणी पुरवठा तपासणे त आला आहे त्या मध्ये पाण्याची गुणवत्ता उत्तम प्रतीची असल्याचे दिसून आले आहे शिरसुला बोळा पासून खालील चार ही बोळा तील पाणी तपासणे त आलेले आहे चांगल्या प्रतीचे व प्रकारचे पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आला आहे सदर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून उस्फुर्त अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.सदर कामी मा.आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, व्यकटेश चौबे, उपअभियंता तपन डंके यांचे तांत्रिक मार्गदर्शनाखाली काम करणेत आले आहे तसेच एरिका कंपनी अभियंता प्रतिनिधी लोबो, शशांक , आणि अमोल पाडवे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे तसेच इकडील कार्यालया कडील सदर परिसराचे कनिष्ठ अभियंता मधुसूदन पवार यांनी प्रत्यक्ष जागेवर कामकाज केले त्यास झोन क्रं 2 चे इतर अभियंत्यांनी म्हणजे दीपक कुंभार आकाश कोकरे अनिकेत कावळे यांनी एकत्रित येऊन टीम वर्क ने कामकाज केले सदर परिसरातील नागरिकांनी आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत.

