पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये माढा व पंढरपूर तालुक्यातील जवळपास ४७पेक्षा जास्त कुटुंबियांशी संपर्क झाला असून आज पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी संपर्क करून काळजी घेण्याचे सांगितले आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तत्काळ विशेष विमानाची सोय करून त्यांना परत घेऊन येण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे. घाबरून जाऊ नका..

आम्ही अडकलेल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व नातेवाईकांना आवाहन केले आहे.