• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

समर्पित भावनेने काम करा पक्ष तुम्हाला नक्कीच संधी देईल : आमदार देवेंद्र कोठे

by Yes News Marathi
April 22, 2025
in इतर घडामोडी
0
समर्पित भावनेने काम करा पक्ष तुम्हाला नक्कीच संधी देईल : आमदार देवेंद्र कोठे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहर मध्य मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर; अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांना संधी

सोलापूर : भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे काम करावे. जुन्या-नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना न्याय द्यायचे काम पक्ष निश्चितच करेल, अशी ग्वाही शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिली.

भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात मंडल अध्यक्ष नियुक्ती जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याअंतर्गत भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर मध्य मतदार संघात मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजीखाने, मध्य मध्य मंडल अध्यक्षपदी नागेश सरगम तर मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यावेळी या तीनही नूतन अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पुढे बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ भारतातच नव्हे जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या संघटन पर्व अंतर्गत महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्यात आले. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात संघटन पर्व अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. ही अध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय प्रेरणादायी म्हणावी लागेल. कारण या पक्षात रचना, प्रक्रियेला महत्त्व आहे. काम करणाऱ्याला कार्यकर्त्यांना पक्ष निश्चितच संधी देते, हे या नियुक्ती प्रक्रियेने दाखवून दिले आहे. ज्यांना संधी मिळायला नाही त्यांचादेखील पक्ष नक्कीच विचार करेल. यापूर्वी शहर मध्यमधील भाजपचा कार्यकर्ता हा विकास कामांसाठी निधी आदींबाबत वंचित होता, पण आता या मतदारसंघात भाजपचा आमदार झाल्याने कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी कामे सुचवावीत, त्याची पूर्तता केली जाईल तसेच पक्षाकडून कार्यकर्त्यांना संधी देखील दिली जाणार आहे, अशी मी ग्वाही देतो.

शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की, जुने व अनुभवी कार्यकर्ते या निकषावर पक्षाकडून मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. नूतन मंडल अध्यक्षांवर जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांना बूथ अध्यक्ष व बूथ सदस्यांसोबत संपर्क ठेवावा लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळी होती. महापालिका निवडणुकीचे गणितही वेगळे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची गणिते गृहीत धरून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत गाफील राहू नये. महापालिका निवडणुकीसाठीदेखील जोमाने काम करण्याची गरज आहे.

याप्रसंगी बोलताना माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले की, आज झालेल्या नियुक्त्या ही केवळ आकडेवारी नाही, तर जनाधार आणि जनविश्वासावर आधारित असणारी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. आता अधिक लोकांपर्यंत पोहोचत, सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधत, भाजपा राज्यामध्ये अंत्योदयाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हे सांगणारी भाजपा परिवाराची विचारधारा आपापल्या मंडल परिसरात नव्याने रुजवण्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.


या कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस विशाल गायकवाड, संघटन पर्व निवडणूक अधिकारी श्रीनिवास करली, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, प्रशांत फत्तेपुरकर, प्रवीण दर्गोपाटील, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, जेम्स जंगम, माजी नगरसेवक अनिल पल्ली,मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, राजेश अनगिरे, माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू, मीनाक्षी कंपली, महिला मोर्चाचे संगीता खंदारे, अंजली वलसा,शर्वरी रानडे, जैन प्रकोष्ठेचे एड . साधना संगवे, व्यंकटेश कोंडी, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, रामदास मगर, अंबादास (बाबा) करगुळे, शिक्षक आघाडीचे दत्तात्रय पाटील सर, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भटक्या विमुक्त जाती मोर्चाचे लक्ष्मण गायकवाड, SCमोर्चा मोर्चा शहराध्यक्ष मारेप्पा कंपेली,, अनंत गोडलोलू,महेश बनसोडे, क्रीडा प्रकोष्टचे यशवंत पाथरूट, OBC मोर्चा उपाध्यक्ष श्रीनिवास जोगी, विजय महिंद्रकर,प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम,महेश अलकुंटे,मनोज कलशेट्टी,राम गड्डम, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, किरण भंडारी,अप्पू कडगंची,शिरीष गायकवाड, इजाज सय्यद, रवी भवानी, रमेश पतंगे, नरेश पतंगे, राजशेखर येमुल, बाबुराव शिरसागर, मनोज पिस्के, सतीश तमशेट्टी,विशाल धोत्रे, विजय धोत्रे, प्रकाश गाजुल,गोविंद बत्तुल,रमेश मिट्ठा, ज्ञानेश्वर गवते,आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी 43 अंश अशा तापमानाची नोंद…

Next Post

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर…

Next Post
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर…

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group