सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील आदर्श शिक्षक समिती महिला आघाडी अध्यक्षपदी रेश्मा कवडे यांची तर सरचिटणीसपदी सुमन बनसुडे यांची निवड करण्यात आली. तसेच बाभूळगाव केंद्र संघटकपदी समाधान आयरे तसेच चळे केंद्रसंघटकपदी लहानू पवार यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकार्यांचा अभिनंदनपर सत्कार जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत व जिल्हा महिला आघाडीप्रमुख भाग्यश्रीताई सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजकुमार राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर नारायण मोरे होते.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजीव चाफाकरंडे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब मिसाळ, आदर्श शिक्षक समितीचे नेते विजय लोंढे, रामभाऊ कोळी, सरचिटणीस महादेव कोळी, उपाध्यक्ष विजय शिंदे, तालुका कोषाध्यक्ष राहुल जाधव, तालुका प्रसिद्धीप्रमुख परमेश्वर घोडके तसेच राजकुमार खाडे, सत्यवान कारंडे, योगेश येवले, रविकांत मोरे आदी उपस्थित होते.