येस न्युज मराठी नेटवर्क : (शिवानंद जाधव) सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील ग्रामदेवता जकराया महाराजांची यात्रा 13 एप्रिल पासून सुरू झाली होती. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी चार वाजता मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा व हुलजंती येथून महालिंगराया आणि जकराया यांच्या पालख्यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर भाकणूक संपन्न झाली. पाऊस वेळेवर पडेल, सोने आणि जमीन महाग होईल अशी भाकणूक सांगण्यात आली. याच दिवशी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या यात्रेस भेट दिली.



दुसऱ्या सोमवारी 14 एप्रिल रोजी तीनही देवतासह गावातील देवतांना गोड नैवेद्य दाखवण्यात आले.. सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा फड रंगला. यात 51000 ची कुस्ती सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी जिंकली. तिसऱ्या दिवशी मंगळवारी तिन्ही पालख्या गावाच्या चावडीत येतात. यावेळी गावातील कलाकार विविध कला सादर करतात.
याच रात्री बिरोबा आणि महालिंगराया या पालखींना निरोप देण्यासाठी गावातील सर्व भाविक एकत्रित येतात. जकराया मंदिरातून वाजत गाजत तीनही पालख्या या गावाच्या वेशीपर्यंत आणल्या जातात. बिरोबा आणि महालिंगराया या दोन्ही पालख्यांना जकराया पालखीकडून देऊन निरोप दिला जातो. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी गावातील हजारो भाविक उपस्थित होते..अश्या पद्धतीने येणकी येथील यात्रेचा मंगळवारी झाला समारोप झाला.



