अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तशा आशयाचा एक ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला आहे. सोमवारी रात्री हा धमकीचा ई मेल आला होता. या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला होता. ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. धमकीचा मेल मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टने एफआयआर दाखल केला आहे.