सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ अॅड. श्री अश्विनी उपाध्याय यांचे महान भारत या विषयावर विकास सहकारी बँकेतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २० एप्रिल रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक ,सोलापूर येथे हे व्याख्यान होणार आहे.
अॅड. अश्विनी उपाध्याय हे घटना तज्ञ म्हणून प्रसिद्ध असून अनेक टीव्ही कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केले जाते. सनातन धर्माच्या संरक्षणासाठी आजपर्यंत २०० हून अधिक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात व इतर कोर्टात त्यांनी दाखल केलेली आहेत.
भारताची कायदा प्रणाली ही जगात सर्वोत्तम करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आजतागायत ५०० हून अधिक जाहीर कार्यक्रमात त्यांनी व्याख्यान दिलेले आहे.
विकास सहकारी बँक ही सोलापुरातील एक नामवंत सहकारी बँक असून कायम ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन योजना बँकेतर्फे आणल्या जातात. अंदाजे सहाशे कोटी रुपयाचा व्यवसाय असणारी ही बँक शून्य एनपीए असून सतत १२ टक्के लाभांश देणारी बँक आहे. बँकेतर्फे प्रतिवर्षी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात येते तसेच अनेक नामवंत व्यक्तींच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात येते. यापूर्वी अयोध्येतील श्री रामलल्लाचे मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचे देखील बँकेतर्फे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री. कमलकिशोरजी राठी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सीए राजगोपाल मिणियार, व्हा. चेअरमन राजगोपाल चंडक, संचालक सर्वश्री नंदकिशोर मुंदडा, doc. नवनीत Toshniwal, ओमप्रकाश तिवाडी, सुरेश बिटला , जनरल मॅनेजर सीए पी. एस. मंत्री आदी उपस्थित होते.