येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील विजापूर रोड येथील अशोक नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वस्तीगृह येथेल परिसरात औषधी वन ची निर्मिती करण्यात आली. 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी आणि यांनी संविधान निर्माण केलेल्या संविधान तत्त्वावर पर्यावरणाचा संरक्षण करणे या लिहिलेल्या संविधानाच्या कायद्यानुसार वृक्ष लागवड व संवर्धन करून महामानवांच्या विचारावर प्रयत्नशील राहुन अभिवादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला .सोलापूर शहरात हरित सोलापूर करण्याच्या अनुषंगाने सोलापुरातील अनेक पर्यावरण मित्र संस्था, महाविद्यालय एकत्र येत आहेत सोलापूर सोशल फाउंडेशन हरित सोलापूर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय स्वातंत्र्य सैनिक छन्नूभाई भाई चंदेले महाविद्यालय मधील विद्यार्थी व पर्यावरण मित्र इको नेचर क्लबचे सदस्य सोलापूर सोशल फाउंडेशन, वस्तीगृह मधील विद्यार्थी व कर्मचारी त्या सर्वांच्या सहभागाने वृक्ष लागवड करण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थिती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा.डॉ. विश्वास भास्कर गायकवाड हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे संचालक व शिक्षण परिषद सुकांण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्राध्यापक विजय लोंढे , प्राध्यापक विशाल पाटील. संस्थेच्या सचिवा सौ मनीषा ताई पाटील, राम हुंडारे सर व पत्रकारिता वर्गाचे सर्व विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून ज्यांची ओळख आहे.
डॉ मनोज देवकर यानी पर्यावरण संवर्धन संदर्भातील संविधानातले कायदे व त्याचे महत्त्व व चे विविध संरक्षण याबद्दल सर्वांना माहिती दिली व पुढे सोलापुरातील सर्वाना एकत्रित घेऊन हरित सोलापूर करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणाची शपथ ही घेतली. यावेळी आवळा जांभूळ अर्जुन कडुलिंब पिंपळ वाड ईलायची चिंच. बदाम, अशा देशी व औषधी 50 वनस्पतीची लागवड करण्यात आली. व पुढील काळात ही त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे
पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी संविधानातील पर्यावरणा संदर्भात खालील प्रमाणे माहिती दिली आहे पर्यावरण संदर्भात भारतीय संविधानात कलम ४८अ आणि कलम ५१अ(छ) या तरतुदी आहेत. या तरतुदीनुसार, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे राज्याचे आणि नागरिकांचे कर्तव्य आहे.

पर्यावरण संदर्भातील संविधानातील तरतुदी
कलम ४८अ: राज्यांना पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करणे
कलम ५१अ(छ): नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण मिळते, म्हणून त्याचे संरक्षण करणे आणि त्याची गुणवत्ता सुधारणे हे आपले कर्तव्य आहे.
पर्यावरण संरक्षणाशी संबंधित कायदे
वन संरक्षण कायदा, 1980
पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986
वन्यजीव संरक्षण कायदा, 1972
पर्यावरण कायद्याचे उद्दिष्ट
पर्यावरणाचे संरक्षण करणे
जंगले, खनिजे किंवा मत्स्यपालन यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करणे
प्रदूषण नियंत्रण करणे
जैवविविधता संरक्षण करणे
वृक्ष लागवड व संवर्धन करणे
हवामान बदल कमी करणे
शाश्वत विकास करणे.