७१ विद्यार्थ्यांनी घेतला अध्ययनात सहभाग
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मेडिकल रिसर्च सोसायटी, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून रविवार १३ एप्रिल रोजी “सलग १८ तास अध्ययन अभियान व स्पर्धा -२०२५” आयोजित करण्यात आली. सलग १८ तास अध्ययन अभियानाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे अभियान सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात झाले. यात ७१ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा परदेशात राहून दररोज १८ ते २० तास अभ्यास करून त्यांनी विविध पदव्या संपादन केल्या. संपूर्ण जगामधे ‘ज्ञानाचे प्रतीक’ अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या ज्ञानाला व कार्याला अभिवादन म्हणून त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी सन २००७ पासून दरवर्षी हे अध्ययन अभियान राबवले जाते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. औदुंबर मस्के, डॉ. सचिन बंदीछोडे, डॉ. सुशील सोनवणे, डॉ. स्वाती मुने, डॉ. शंकर टेंगळे, डॉ. गजानन जत्ती, डॉ. अवधूत डांगे, डॉ. रवी कंदलगावकर, डॉ. संचित खरे, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. गायत्री चक्रे, डॉ. सूरज थोटे, डॉ. मनोज वेदपाठक, डॉ. स्वप्नील सांगळे, वैभव लादे, डॉ. प्रशांत शिरुरे, ७१ डॉ. सुलभा दातार, कविवर्य देवेंद्र औटी, अॅड. रवी गजधाने, विशाल इरागंटी, स्वप्नील ठाकरे, शशिकांत साळवी, ज्ञानेश्वर जोशी व अर्चना नाचरे यांनी परिश्रम घेतले.
नंतर झाली परीक्षा
सकाळी सहा वाजता अध्ययन अभियान सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १७ तासात वाचून होईल इतका अभ्यासक्रम दिला जातो व शेवटच्या तासात त्यांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा व स्पर्धा घेतली जाते. परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते.