सोलापूर-, सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर मध्ये काल पाठारे प्रभू यांचा फूड फेस्टिवल सुरू झाला आहे हा फूड फेस्टिवल १७ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. पारंपारिक पाककलेचा अनोखा संगम आणि उत्तम चवींचा अनुभव घेण्यासाठी पाठरे प्रभू फूड फेस्टिव्हल हा बालाजी सरोवर मध्ये दररोज सायंकाळी ७:३० ते ११:०० या वेळेत आयोजित केला आहे.
कुशल शेफ्सची खास भेट
प्रसिद्ध शेफ बिंबा नायक आणि बालाजी सरोवर प्रीमियर कार्यकारी शेफ महेश जाधव यांनी एकत्र येऊन पाठरे प्रभू समुदायाच्या हजारो वर्षांच्या पारंपारिक पाककलेद्वारे खास मेन्यू तयार केला आहे. त्यांच्या खास पाककृतींमध्ये पारंपारिक चवींचा आणि कौशल्याचा अनोखा संगम अनुभवता येईल. तसेच विविध डाळी, फळे आणि हंगामानुसार तयार भाज्यांचे पदार्थ याची देखील चव चाखता येणार आहे
या पाठारे प्रभू फूड
उत्सवामध्ये दररोज संध्याकाळी खास डिनर सोबतच रविवारचा ब्रंच देखील आयोजित करण्यात आला आहे, सोलापूरकरांनी याचा आस्वाद घेण्यासाठी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेल मध्ये यावे असे आवाहन करण्यात आले









