मुंबई – एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज प्रताप सरनाईक यांनी परिवहन अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व कागदपत्रांवर सही करत आज अधिकृत रित्या अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारला आहे, त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती भाष्य केलं आहे. एसटी बसता प्रवास खडतर आहे पण चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. आता परिस्थिती चांगली नाही. पण, माझ्याकडे असलेल्या अनुभवातून येत्या दीड दोन वर्षात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. वेतनाचा प्रश्न काल तुमच्या माध्यमांतून पोहचला होता. 900 कोटींची मागणी होत असताना केवळ 272 कोटी मिळावे हे बरोबर नव्हते, 30 ते 50 हजारांचा पगार त्यांना असतो, भविष्य निर्वाह निधी वगैरे पण द्यायचा असतो, काल ही सर्व बाब समोर आली, काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो त्यांनी मग वित्त सचिवाची बोलून मंगळवार पर्यंत पगार होईल असे सांगितले आहे. आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत? असा सवाल देखील यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला आहे.