• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, August 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

by Yes News Marathi
April 10, 2025
in इतर घडामोडी
0
मृत ममता म्हेत्रे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी दिली एक लाखाची मदत…
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • पालकमंत्री गोरे यांच्याकडून जगजीवन राम झोपडपट्टीचे पाहणी व मृत शालेय विद्यार्थ्यांनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन

ड्रेनेज लाईन कामकाजासाठी दोन कोटीचा निधी देणार

सोलापूर – सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता
व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.


सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार देवेन्द्र कोठे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपआयुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीष पंडित, सह. नगर रचना संचालक मनिष भीष्णूकर, नगर अभियंता सारिका आकूलवार, सर्वाजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, आरोग्य अधिकारी राखी माने तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की महापालिकेने या भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. आणि आवश्यक असल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबत हलगर्जी करू नये असे निर्देशित करून ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या समस्येवरील उपाय योजनेसाठी तातडीने 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून मृत विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही पालकमंत्री गोरे यांनी दिले. याशिवाय, जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी दवाखाना सुरू करण्याबाबतही निर्देश दिले गेले.


बैठकीच्या प्रारंभी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जगजीवन राम झोपडपट्टी येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली. या सर्वेक्षणात पाणी तपासणी, फवारणी, दुरावणी यांचा समावेश आहे. तसेच, बाधीत क्षेत्रांमध्ये फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे, तसेच पाण्याच्या पुरवठ्यासाठी असलेल्या पाईपलाईन काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधून जात आहेत, ज्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून संबंधित विभागाला पाईपलाईन बदलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्री गोरे यांच्याकडून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जगजीवन राम झोपडपट्टीतील दुर्दैवी घटना घडलेल्या विद्यार्थिनींच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी समवेत झोपडपट्टीची पाहणी करून आरोग्य तपासणी करणे या ठिकाणी दवाखाना उभारणे याबाबत सूचना देऊन ड्रेनेज लाईन कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.

Previous Post

मृत ममता म्हेत्रे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी दिली एक लाखाची मदत…

Next Post

आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post
आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group