सोलापूर, दिनांक, ०६ एप्रिल २०२५
पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरच्या वतीने समाजाच्या विविध उपक्रमास देणगी देणाऱ्या पद्मशाली समाजबांधवांचा श्री मार्कंडेय मंदिर सोलापूर येथे ह. भ. प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या शुभहस्ते खासदार प्रणिती ताई शिंदे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.



यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाली येलदी, सरचिटणीस संतोष सोमा, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर अरकाल, नरसय्या ईप्पाकायल, रामचंद्र जन्नू , रमेश कैरमकोंडा, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम यांच्या सह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.