अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद ओढावण्याची चिन्हे आहेत. या सिनेमाचा नुकताच टिझर प्रदर्शित झाला. या टिझरवर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असं वक्तव्य केलं असून या चित्रपटातील काही सिनवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी फुले चित्रपटासाठी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रत्येक सिनेमा तयार होताना त्याची सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. अनेक पुस्तके आणि उपलब्ध साधनांचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला असल्याचं ते म्हणालेत.
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 11एप्रिल 2025रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे.