सोलापूर – सोलापूरच्या मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मुलीचे मृत्यू झाले आहे अशी तक्रार आल्या होत्या. त्या अनुषंगाने डॉ. व्ही.एम.जी.एम. महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवाल नुसार त्यांचा मृत्यू हा डेंगू सदृश आजार (मेंदूज्वर) या आजाराने मृत्यू झाला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्याठिकाणी प्रत्येक्ष भेट देऊन त्याठिकाणी मृत्य पावलेल्या मुलींच्या कुटुंबाशी भेट घेतली. झालेल्या प्रकार दुर्देवी असून कुटुंबांचे सांत्वन केले. तसेच त्या परिसरातील पाण्यासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या व आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलेरिया विभाग व विभागीय कार्यालय यांना तात्काळ कार्यवाही करण्याची आदेश दिले. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. वैद्यकीय पथक, जी.एन.एम., ए.एन.एम, एम.पी.डब्लू-एम., आशा स्वयंसेविका यांनी त्या परिसरातील मलेरिया व डेंगू या कीटकनाशक आजाराचे सर्वेक्षण सुरु केले.
जिया महादेव म्हेत्रे १५ वर्षांची विद्यार्थी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी हिला दि.०४/०४/२०२५ रोजी अॅडमिट करण्यात आले. तिला गेल्या तीन दिवसांपासून ताप, डोकेदुखी, अंग दुखी इत्यादी त्रास होत होता. शरीरावर पुरळ दिसून येत होते तिला रुग्णालयात एक झटका आला होता. तिला अति दक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले आणि त्यानंतर ती डेंगूसदृश ताप (मेंदूज्वर) मेंदूत गेल्याने उपचारास प्रतिसाद न दिल्याने दि. ०५/०४/२०२५ रोजी तिचा मृत्यू झाला आहे.
ममता अशोक म्हेत्रे १४ वर्षांची विद्यार्थी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी हिला दि.२७/०३/२०२५ रोजी अॅडमिट करण्यात आले. तिला गेल्या नऊ दिवसांपासून ताप, डोकेदुखी, अंग दुखी, एक दोन वेळा जुलाब व उलटी इत्यादी त्रास होत होता. शरीरावर पुरळ दिसून येत होते. तिला अति दक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले आणि त्यानंतर ती डेंगूसदृश ताप (मेंदूज्वर) मेंदूत गेल्याने उपचारास प्रतिसाद न दिल्याने दि. ०४/०४/२०२५ रोजी तिचा मृत्यू झाला आहे.
जयश्री महादेव म्हेत्रे १३ वर्षांची विद्यार्थी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी हिला अति दक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले. ती सद्य बेशुद्ध आवस्थेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना असे अवाहन करण्यात येते कि, आपल्या परिसरात कोणत्याही नागरिकांना ताप, उलटी, जुलाब, डोके दुखी, शरीरावर पुरळ इत्यादी लक्षणे दिसल्यास तात्काळ मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका व विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधावा. तसेच शहरीतील खाजगी रुग्णालय यांच्याकडे डेंगू सदृश रुग्ण चिकण गुनिया, मलेरिया इत्यादी रुग्ण असल्यास मुख्य आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका कळवावे. तसेच शहरातील नागरिकांनी परिसर स्वच्छता ठेवावी व सर्वात महत्वाचे आठवडाचे “एक दिवस कोरडा दिवस पाळावा”. घरातील पिण्याचे भांडी धुऊन, स्वच्छ पुसून ठेवावी. तसेच घरात पाण्याची साठवण ठेवू नये. जर साठवण केल्यास पाण्याच्या टाकीचे झाकण घट बंद करावे.