सोलापूर : सोलापुरात शनिवारी सकाळी चार हुतात्मा चौकात एक अनोखा उपक्रम पार पडला. पक्षांना पाणी ठेवण्यासाठीची तब्बल 1000 जलपात्रे पाणपोई या संस्थेकडून मोफत वाटण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोलापुरातील पक्षी प्रेमींसाठी ही जलपात्रे वाटप करण्यात आली. अहमदाबाद येथील अंकुर इंडस्ट्रीज, सोलापुरातील लिटल फ्लॉवर शाळेतील 1988 च्या बॅचचे दहावीचे माजी विद्यार्थी आणि येस न्यूज मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजता जलपात्र वाटण्यास सुरुवात झाली हातोहात म्हणजे साडेअकरा वाजेपर्यंत ही 1000 जलपात्रे संपली.
सोलापुरात पक्ष्यांसाठी जलपात्र दिली आहे. त्यांना पाणी ठेवा म्हणजे सोलापूरचा पाण्याचा प्रश्न मिटेल असे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या…
खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या पाणपोई उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही पाणपोई उपक्रमाचे कौतुक केले. पावसाळ्यात आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे असा सल्ला देखील दिला.
या कार्यक्रमास शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, गिरीश दर्बी, मोहन डांगरे, भरत छेडा, राजू राठी, पत्रकार अविनाश कुलकर्णी समाजसेवक वसंतराव जाधव, एडवोकेट मंगला चिंचोळकर, हेमा चिंचोळकर, मधु आरसीद आप्पासाहेब हुमनाबादकर, लिटल फ्लॉवर हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर सिलिन, पद्माकर कुलकर्णी, उदय चाकोते, महबूब मुल्ला हे मान्यवर उपस्थित होते.













हरळी प्लॉट योगासन मंडळाचे पदाधिकारी, पक्षी प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांनी रांगा लावून पक्षांसाठीची ही जलपात्रे घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटल फ्लावर चे माजी विद्यार्थी अंकुर इंडस्ट्रीजचे जितेंद्र व्होरा, द्वारका उपलप, रमेश रापेल्ली, वैभव सावंत, प्रशांत कांबळे, शिल्पा जोशी, प्रसाद कुलकर्णी, राजेश पाटील, डॉक्टर नितीन बलदवा, सतीश जाधव, उदय चाकोते, शिवाजी सुरवसे यांच्यासह येस न्यूज मराठीच्या टीमने परिश्रम घेतले