सोलापूर:- दिनांक 3 एप्रिल सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल येथे होऊ घातलेल्या सिंथेटिक ट्रॅक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अनेक त्रुटी ठेऊन एक डि सिंथेटिक व दुसरा डि मातीचा ठेऊन कमी बजेट मधील ट्रॅक चे जेव्हा सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या व जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनाच्या लक्षात आले. तेव्हा पासून तातडीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मिटींग झाली त्या मिटिंगमध्ये महाराष्ट्र शासनाने सिंथेटिक ट्रॅक व इतर कामासाठी मजूर केली. रक्कम प्राधान्य सिंथेटिक ट्रॅक ला न देता वॉल कंपाऊंड ज्याची गरज नाही. हॉस्टेल डागडुजी अंतर्गत रस्ते व इनडोअर गेम्स हॉल दुरुस्ती ह्या बाबत टेंडर काढून झाल्यावर भविष्यात अशा अर्धवट ट्रॅक वर पाऊस आल्यास स्पर्धा घेता येणार नाही.

भालाफेक मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एक सुवर्ण व रौप्य पदक मिळालेल्या भालाफेक धावण मार्ग मातीचे व उंच उडी साठी त्याच डि मध्ये व्यवस्था असते व हतोडा फेक साठी व्यवस्था असते ह्या बाबी मैदानावर सिंथेटिक नसतील, तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व स्कूल गेम फेडरेशन राज्य स्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेता येणार नाही व आता नवीन सिंथेटिक ट्रॅक करताना 100 मीटर चे 10 लेन चे ट्रॅक बनवले जात आहेत त्याची मागणी झाली होती. त्या प्रमाणे सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांना भेटून निवेदन दिले होते. त्या प्रमाणे त्यांनी आजच्या झालेल्या पालकमंत्री यांच्या आढाव्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन व मागणी करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक संघटना चे अध्यक्ष दशरथ गुरव ॲथलेटिक्स असोसिएशन चे सचिव राजू प्याटी उपस्थित होते.