सोलापूर : जुळे सोलापूर येथील टाकळीकर बंधूंच्या गंगा लॉन्स या जागेवर किमया ग्रुपचे “किमया स्वप्नसृष्टी” या नावाने १६८ सदनिकांचे १५ मजली गंगा व कमल अशा दोन इमारती बांधण्यात येणार असून, या प्रकल्पाचे उद्घाटन समारंभ रविवार दि. ६ एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आल्याची माहिती समिर गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुळे सोलापूर येथील या जागेवर २ व ३ बेडरूम, हॉल व किचन चे १६८ सदनिकांचे १५ मजली गंगा व कमल अशा दोन भव्य इमारती तसेच भगवान श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर हे या गृह प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहे. या सोबतच या गृह प्रकल्पामध्ये बगीचा, वॉकिंग / जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, योगा ऐरोबिक सेन्टर, सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईट, कॉमन जिम, क्रिकेट टर्फ, लायब्ररी व इनडोअर गेम्स इ. या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. हा पूर्ण प्रकल्प उच्च मध्यमवर्गियांसाठी परवडण्याऱ्या दरात सादर करण्यात येणार आहे, यामुळे अनेकांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मागील २५ वर्षामध्ये किमया ग्रुपच्या वतीने विविध औद्योगिक, वाणिज्यक व दर्जेदार गृह प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच जुळे सोलापूर मधील रुबी नगर येते “किमया स्वप्नपुर्ती फेज २” हा १७६ फ्लॅट्सचा प्रकल्प सुरु असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रवर्तक समिर गांधी यांनी दिली. सोलापूरसह पुण्यात ही अनेक प्रकल्प सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी किमया ग्रुपचे संचालिका डॉ. सौ. दिपाली गांधी, संचालक स्मित गांधी, गंगा लॉन्सचे श्रीकांत व शशिकांत गोविंद टाकळीकर उपस्थित होते.