८ मार्च महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग यांच्या वतीने आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे आरटीओ इन्स्पेक्टर प्रतीक्षा नारायणकर, माजी नगरसेविका सुनीताताई रोटे, एडवोकेट अर्चना कुमठेकर
आदर्श महिला म्हणून डॉक्टर, एडवोकेट, पोलीस लघुउद्योजिका , समाजसेविका, ग्रामपंचायत अधिकारी, माजी सैनिक पत्नी असे अनेक क्षेत्रातील महिलांचा सत्कार समारंभ सादर करण्यात आला.
कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, लघुउद्योग, महिला हक्क व अधिकार यावर मार्गदर्शन व्याख्यान देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्षा कविता कोडवान व सचिव धर्मा कोडवान
सूत्रसंचालक अनिता धुते यांनी केले.
यावेळी उपस्थित शोभा धुळेराव, सुरेखा काळे, आशा सातपुते, सुनिता दळवी, मनोज देवोकर,शिवाजी कोडवान, राजू काळे, निखिल दळवी व इतर महिला वर्ग उपस्थित होते.