शबरी कृषि प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र सोलापूर येथे सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरी १.३० वा. किसान सम्मान समारोह या कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भागलपूर, बिहार येथे होणाऱ्या किसान सम्मान समारोह कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते १९ व्या किसान सम्मान निधीचे वाटप होणार आहे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भारतातील सर्व कृषि विज्ञान केंद्रावर दाखविण्यात येणार आहे. सोलापूर कृषि विज्ञान केंद्र येथील सदरील कार्यक्रमास उदघाटक म्हणून मा. श्री. रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व सबलिकाषण, भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रगतशिल शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषि प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदिपजी गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
पी. एम. किसान ही केंद्र सरकारची महत्वकांशी योजना असून फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झाली असून आत्तापर्यंत त्याचे वार्षिक रू. ६०००/- प्रति शेतकरी प्रमाणे ११ कोटी शेतकऱ्यांना १८ हप्त्याव्दारे ३.४६ लाख कोटी रूपयोचे वाटप झाले असून सदरील कार्यक्रमात १९ व्या हप्त्याचे वाटप होणार आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री तथा ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट मंत्री जयकुमार गोरे, सोलापूरचे विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्येचे आ. देवेंद्र कोठे, दक्षिण सोलापूरचे आ.सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेटी, आर. पी. आय. चे (आठवले पक्ष) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार अशिर्वाद, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीनकुमार रणशूर, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. कांतप्पा खांत इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वा होणार आहे. सुरुवातीला कार्यक्रमात कृषि प्रदर्शनात मान्यवर पहाणी करतील, त्यांनतर मा. मंत्रीमहोदय रामदासजी आठवले उपस्थितांना मार्गदर्शन करतील त्यानंतर मा. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भागलपूर, बिहार येथून करण्यात देणार ना सदरील कार्यक्रमामध्ये पुरुष व महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, उत्फुर्तपणे सहभागी होणार आहेत.
तरी अधिकाधीक शेतकरी बांधवानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र सोलापूरचे कांप्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी केले आहे.