सोलापूर दि.17 (जिमाका):- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता मुंबई विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण व दुपारी 12 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन.
दुपारी 12.15 वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन. दुपारी 2.00 ते 4.00 वाजता बालाजी सरोवर येथे राखीव. सायंकाळी 4.00 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथून सोलापूर बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 ते 5.00 बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे पहाणी. सायंकाळी 5.00 वाजता बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथून एस.टी. ने जिल्हा धाराशिव कडे प्रयाण. रात्रौ 8.45 वाजता बस आगार येथून सेालापूरकडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन व मुक्काम. गुरूवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल बालाजी सरोवर सेालापूर येथून तुळजापूर कडे प्रयाण करतील.