दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ तुळशी फाटा येथे दुचाकी क्रमांक MH 45 AK 2577 वरून दोघे तरुण टेंभूर्णी येथे जात असताना तुळशी वरुण येणाऱ्या एका वाळू वाहतूक करणाऱ्या टिपर क्रमांक BR 06 GC 2267 ने दुचाकीस समोरून जोरदार धडक देऊन दुचाकीस दहा मीटर फरफटत घेऊन गेल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालक दिनेश खडके वय ४२ , रा. मोडनिंब, ता- माढा जिल्हा सोलापूर याचा टीपरचे चाक अंगावरून गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले धनाजी बागल वय ४७ वर्षे, रा.कुर्डुवाडी, ता.माढा, जिल्हा सोलापूर हे डोक्यात गंभीर मार लागून गंभीर जखमी झाले.
सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषास वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी तात्काळ दाखल केले तर मृत्यू झालेल्या तरुणास. शवविच्छेदनासाठी टेंभूर्णी येथील शासकीय रुग्णालयात टेंभूर्णी येथील खासगी हा रुग्णवाहिके मधुन अकबर भाई खान यांनी दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक संतोष खडके, नागनाथ भालेराव, नवनाथ मोरे आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे साहेब (PSI) , मल्लिकार्जून सोनार साहेब (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तसेच टेंभूर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक पाटील (PI)साहेब हेसुध्दा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून ,या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे.