प्रसिद्ध टूर कंपनी ‘केसरी’चे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे वयोमानामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने पर्यटन उद्योगात शोककळा पसरली आहे. 1984 पासून त्यांनी ही कंपनी सुरू केली. मध्यमवर्गीयांचेही परदेशी फिरण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. गेल्या 40 वर्षांत त्यांनी केसरी टुर्स ही कंपनी मोठी केली आणि या कंपनीचे जगभरात नाव झाले. देशभरात, जगभरात या कंपनीच्या अनेक शाखा आहे. अनेक कस्टमाईज्ड टूर्सही या निमित्ताने ग्राहकांसाठी आणल्या जातात.
केसरीभाऊ यांनी वयाच्या 50 वर्षी त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना करून प्रचंड कष्टाने जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास उदयास आणली. त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे. त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदये जिंकली आहेत. आज त्यांचे वांद्रे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.