सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी अभयांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये “यशस्वी स्टार्ट अप आणि इनक्युबॅशन केंद्राची स्थापना व संचालन : महसूल I N R 2.5 ते 25 कोटी “या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न झाला. या सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. सूर्यकांत पाटील मिसेस हनी कुमारी,आणि मिसेस ख़ुशी चाटुकर,पुणे यांनी आपले विचार मांडले त्यांनी स्टार्टअप वर मार्गदर्शन, इनक्युबॅशन धोरणे आणि उद्योजकीय विकास यावर उपयुक्त माहिती दिली. या सेमिनारसाठी उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांचे असते या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत केले असून या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने म्हणाले की या सेमिनारमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी व समन्वय उद्योजकी शिक्षण क्षेत्रातील नेत्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांना माध्यमातून स्टार्टअप आणि इनक्युबॅशन केंद्राची स्थापना कशी करावी याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच डॉ. सोहेल राणा यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या सेमिनार मुळे महाविद्यालयाच्या इन्क्युबॅशन सेंटरसाठी नवनवीन संधी निर्माण होण्यास मदत होईल आणि भविष्यात स्टार्टअप क्षेत्रात अधिक विद्यार्थी सक्रिय होतील तसेच उपस्थित मान्यवरांचे विशेष कौतुक करून महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र डी. गायकवाड सचिवा अनामिका रवींद्र गायकवाड यांनी महाविद्यालयाने भविष्यात अशा कार्यक्रमाच्या आयोजनाची मोठी तरेने घ्यावे अशी ग्वाही दिली . या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे अकॅडमी डीन प्रो. ए. ए. पेरमपल्ली, प्रो डॉ. अल्ताफ. प्रो. डॉ. स्नेहलता प्रो. डॉ.मून प्रो.डॉ.सोहेल राणा प्रो. धनवले प्रो. अमित वडेराव. प्रो. होनमाने प्रो. नदाफ प्रो. बुरले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.