अ.भा. उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूर च्या वतीने दरवर्षी उर्दू दिनानिमित्त मराठी भाषिकातून उर्दू भाषा अवगत असणाऱ्या व उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या एका मान्यवरांचा ‘उर्दू मित्र’ म्हणून, तर उर्दू साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या योगदानासाठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी आनंद देशपांडे यांचा ‘उर्दू मित्र’ म्हणून तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक आसिफ इक्बाल तर साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे कवि इरफान कारीगर यांना गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक १४/०२/२०२५ रोजी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे शुभहस्ते, जेष्ठ कवि बशीर परवाझ व प्रा. आय. आय. मुजावर (प्रेरक वक्ते) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांयकाळी ६.३० वाजता कॉ. एन. आर. बेरिया शैक्षणिक संकुल, लष्कर येथे आयोजित करण्यात आले आहे.
उर्दू व मराठी भाषिकात संबंध दृढ होऊन त्यांच्यात प्रेम व स्नेहभाव निर्माण व्हावा या हेतूने ‘उर्दू मित्र’ म्हणून गौरव करण्याचा निर्णय बारा वर्षापूर्वी संस्थेतर्फे घेण्यात आला. यापूर्वी डॉ. सतीश वळसंगकर, अॅड. ए. जी. कुलकर्णी, मयुर इंडी, प्रा. मनोहर जोशी, गिरीश चौधरी, मुकुंद भडंगे, शैलेंद्र पाटिल, स्मिता देशपांडे, वैशाली बोने, हेमंत कुलकर्णी व काजोल सुपेकर यांना उर्दू मित्र म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. यावर्षीही संस्थेच्या वतीने उर्दू मित्र व शैक्षणिक व साहित्यीक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल व श्रीफळ तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. आनंद देशपांडे हे कोहिनुर टेक्निकल इन्स्टीटयुट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असुन त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांनी उर्दू भाषा अवगत केली आहे. त्यांना उर्दू भाषेची आवड असून उर्दू भाषेत लिहिता वाचता येते. आसिफ इक्बाल हे सोलापूर सोशल उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असुन त्यांनी उर्दू भाषेतुन एम.ए., बी.एड. व पी.एच.डी. केलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असुन ते उर्दू वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. तसेच इरफान कारीगर हे उत्कृष्ठ कवि असुन ते आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनियरींग अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांना हस्ताक्षर व संगणकाच्या रंगकलेची आवड आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे