येस न्युज मराठी नेटवर्क : शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. मात्र या सत्कारावरून महाविकास आघाडीत एकच वादळ उठले आहे. पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची टीका खासदार संजय राऊत केली. दुसरीकडे, रोहित पवार यांनी या प्रकरणी संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी प्रतिक्रिया दिली असावी, असे म्हणाले. तर खासदार अमोल कोल्हेनी उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही, याची आठवण करून दिली. तर शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी शरद पवारांवर टीका करण्याएवढे संजय राऊत मोठे झाले का? असा सवाल उपास्थीत केला. एकूणच एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून मविआत वादळ निर्माण झाले असून यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.