खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली व जीआय टॅग असलेल्या सोलापूर चादरच्या डुप्लिकेशनच्या गंभीर प्रश्नावर आणि सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्कची प्रलंबित मागणी याची सविस्तर माहिती दिली व मंत्री महोदयांशी चर्चा केली.बनावट उत्पादनांचा बाजार भरडला जात आहे, ज्यामुळे हजारो कुशल विणकरांचा वारसा आणि जीवनमान धोक्यात आले आहे. सोलापूरच्या अनोख्या वस्त्रोद्योग वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मंत्रालयाला कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. याशिवाय, भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी जुळवून घेत, स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सोलापूरमध्ये समर्पित टेक्सटाईल पार्कची उभारणी होणं अत्यंत गरजेचं आहे हि बाब निदर्शनास आणून दिली व वरील विषयांवर निवेदन मंत्री यांना दिली.