सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरे मित्र परिवार वतीने 13 ते 16 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा मैदान, रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कब्बड्डी खुला गट पुरुष, महिला व किशोर किशोरी मुले मुली 55 किलो वजनी गट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा कब्बड्डी अससोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सलग चार दिवस असून सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे शहर ग्रामीण भागातील सुमारे 60 संघ या मध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला विजेता व उपविजेता संघाला चषक ट्रॉफी, उत्कर्ष खेळाडू ला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. 55 किलो वजनी गटातील खेळाडू 1-4-2009 नंतर ची जन्म तारीख असावी 13 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता रामवाडी येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सदर स्पर्धेतून सोलापूर जिल्हा संघाचा संघ निवडला जाणार आहे आणि हा संघ नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा संघाचा प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे खासदार प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेस कार्यअध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक लक्ष्मण जाधव, सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ प्रकाश महानावर, प्र कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी गारे, सुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, राजन जाधव, माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, भाऊ रोडगे, श्रीकांत डांगे, मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सुशील बंइपट्टे, कबड्डी अससोसिएशन अध्यक्ष अनिल जाधव, मदन गायकवाड व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ज्या संघाना स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यानी आपले नावे शिवशरण नुला 9372482064, चंद्रकांत नाईक 9921503610, दिनेश डोंगरे 9403463231 यांच्याकडे नोंदवावित.