सोलापूर : कोरोना महामारीच्या काळामध्ये, अत्यंत जबाबदारीने आणि तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडणारे,सोलापूर महापालिकेचे प्रभाग क्रमांक 24 मधील सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व त्यांचा धन्यवाद व्यक्त करण्याच्या निमित्ताने, नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी, पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप केले. आणि सफाई कामगार करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.