शालेय व विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे क्रीडा प्रकारात उपयुक्त अशा नियम , गुणांकन व खेळतंत्रांच्या निःशुल्क प्रशिक्षणाची कार्यशाळा पोलीस कल्याण केंद्र येथे भाजप क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पाथरूट आणि ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशन व रुद्र अॅकॅडमी ऑफ मार्शल आर्टस व योग संस्था प्रमुख संगीता सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
भव्य जागेत व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संदीप गाडे यांच्या सहमतीने व नॅशनल कोच कीर्तन कोंड्रू यांच्या अनुमतीने संयोजित केलेल्या या कार्यशाळेत काॅमनवेल्थ व साऊथ एशियन मेडलिस्ट वर्ल्ड रँकर अॅथलिट भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव यांनी हैद्राबाद येथील राष्ट्रीय कराटे मुख्यालयामधून ऑनलाईन पद्धतीने आणि राष्ट्रीय अ स्तरीय पंच मिहिर संगीता सुरेश जाधव या तज्ज्ञांनी ऑफलाईन पद्धतीने चौदा व सतरा वर्षाखालील सहभागी अडीचशे कराटेपटूंना अद्ययावत व्हिडीओ क्लीप व प्रत्यक्ष कौशल्य तंत्रांच्या माध्यमातून तीन तासांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले.
भारतात प्रथमच भाजप क्रीडा प्रकोष्ठ कडून योजलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय प्रतिनिधी गणेश पवार, पुअहो सोलापुर विद्यापीठ सिनेट सदस्य सचिन गायकवाड, क्रीडा शिक्षक संघटनेचे दशरथ गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना कोठे म्हणाले की, ” भाजप तर्फे दर्जेदार क्रीडापटू व क्रीडाप्रकारांना आवश्यक त्या साहित्यासह योग्य ते प्रशिक्षक उपलब्ध करवून देऊन अधिकृत स्पर्धेसाठी गरजेची सर्व मदत मिळवून दिली जाईल.” याप्रसंगी अकराव्या काॅमनवेल्थ कराटे चँपियनशीप विजेते भुवनेश्वरी सह आर्या यादव, अक्षिता कुलकर्णी, आदित्य पालिया, संकेत धन्नाईक , समिहान कुलकर्णी आणि खेलो इंडिया राष्ट्रीय कलरीपयत खेळाडू संस्कार कदम, अंश सोलसकर,अनुष्का पल्ली यांचा सत्कार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध कराटे संस्थांचे प्रमुख प्रशिक्षक आकाश झळकेनवरु, शिवशरण वाणीपरीट, प्रभुराज भिमदे, दशरथ काळे (सोलापुर) , यशवंत ढवण (पुणे), हर्षल पाडेलकर (मुंबई) हे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे संयोजन भाजप क्रीडा प्रकोष्ठच्या यशवंत पाथरुट यांनी संतोषकुमार कदम, किशोर सोलसकर यांच्यासह ऋतुराज साठे, अथर्व पवार, ओवी शिंदे यांच्या सहयोगाने पोलीस कल्याण केंद्राच्या प्रशस्त जागेत आधुनिक भव्य स्क्रीन लावून योग्य त्या सोयी सुविधांसह केले गेले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.