सोलापूर – सोलापूर येथील उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे परिवाराच्यावतीने अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून पंढरीच्या माघवारीचे औचित्य साधून वारीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी 10 हजार ताट,20 हजार वाटी आणि 10 हजार ग्लास भेट दिले.
हा कार्यक्रम मुरारजी पेठेतील हॉटेल सूर्या, सोलापूर येथे उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, प्रभावती सुरवसे, राजकुमार सुरवसे, मनीष सुरवसे, वैशाली सुरवसे आदींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी हे सर्व साहित्य अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्याकडे सुपुर्त केले. इंगळे महाराज यांनी मंडळाच्या माध्यमातून हे सर्व साहित्य शहर व परिसरातील माघवारीला जाणाऱ्या दिंडया व वारकरी भाविक तसेच देगाव, बेलाटी, कवठे, तेलगाव, बोरामणी , केगाव, मंगरूळ, डोणगाव, कोंडी आदी गावांतील भजनी मंडळांना दिले. यावेळी सुधाकर महाराज इंगळे यांनी दत्ताअण्णा सुरवसे आणि त्यांच्या परिवाराने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या वारकरी सेवेचा ही यथोचित गौरव केला . दत्ता सुरवसे यांचा या प्रसंगी सत्कार ही करण्यात आला.
वारी व सप्ताह मध्ये स्वच्छताराहावी.पत्रावळी खर्च वाढू नये म्हणून ताट वाटी भेट दिले आहेत असे दत्ता अण्णा सुरवसे यांनी सांगितले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे,प्रदेश सचिव मोहन शेळके , शहराध्यक्ष संजय पवार, सचिन गायकवाड यांच्यासह वारकरी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध दिंडी प्रमुख तसेच भजनी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.