सोलापूर : यशवंत मेंते यांची इरॅसमस मुंडूस या जगविख्यात स्कॉलरशिप साठी निवड झाली आहे. डिसेंन्ट्रलाज एनर्जी सिस्टीम इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडला गेलेला हा भारतातील एकमेव विद्यार्थी आहे. येत्या रविवारी 31 ऑगस्ट रोजी तो उच्चशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना होत आहे या स्कॉलरशिप द्वारे उच्च शिक्षणासाठी त्याला पन्नास लाख रुपये मिळणार आहेत. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमात तो फ्रान्स, इटली ,स्वीडन आणि स्पेन या चार देशात शिक्षण घेणार आहे.
त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण काशीबाई सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे झाले आहे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इंडियन मोडेल स्कूल सोलापुर येथे झाले आहे त्याच्या या यशाबद्दल ए.डी जोशी, अमोल व सायली जोशी यांनी कौतुक केले. यशवंत यांचे वडील सोलापुरातील द किचन किंग या सुप्रसिद्ध इंडस्ट्रीचे मालक आहेत तर आई मीनाक्षी मेंते या इंडियन माॅडेल स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.