सरपंच संतोष देशमुख प्रकरणात महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे .दरम्यान, मनोज जरांगे यांनी नामदेवशास्त्रींवर हल्लाबोल केलाय . स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका,तुमच्याकडून चूक झाली आहे .एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालं आहे , ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो .जातिवादाचा नवा अंक ते देऊन गेले ,असं जरांगे म्हणाले .
महंत नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगडावर जाणार आहे .यावर मनोज जरांगे म्हणाले,हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुटुंबांनं जावं. महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले.नामदेव शास्त्री आरोपींचा समर्थन करत आहे .संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल .
आम्ही तुमचा सन्मान करतो पण आपण आपलं बघावं दुसऱ्याकडे डोकावून पाहू नका .स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका . तुमच्याकडून चूक झाली आहे .एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे .जातीय सलोखा बिघडवायला नको होता .पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला .आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले .जातीयवादाचा अंक भयंकर आहे .असं मनोज जरांगे म्हणाले .