सोलापूर : सोलापूर शहरातील व देशातील पहिल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आजोबा गणपतीचा १३९ वा जयंती उत्सव हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला.
यावेळी मंदिरामध्ये पहाटेपासून रुद्राभिषेक, १००० नामावली , श्री गणेश नामावली, अथर्वशीर्ष पठाण व नवदांपत्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
सकाळी दहा ते बारा या दोन तासांमध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून श्री गणेश पालखी मिरवणूक काढून बारा वाजता गणेश जन्मानिमित्त पाळणा पूजन व गुलाल कार्यक्रम संपन्न झाला. त्याचा नंतर महाआरती घेण्यात आली. यावेळी आजोबा गणपती मंडळाचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे, उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके , सचिव अनिल सावंत, सहसचिव कमलाकर करमाळकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत कळमणकर, बसवराज हळळी,सिद्धारूढ निंबाळे, सिद्धाराम कोणापुरे, विकास भास्कर राहुल कुमने, विशाल फुलारी, ईअण्णा मेंडके, रामचंद्र रेळेकर, विशाल फुलारी, आधी पदाधिकाऱ्यांनी दिवसभराच्या दर्शनाकरिता चोक व्यवस्था बजावली होती.