सोलापूर : लोकमंगल फाउंडेनतर्फे विजापूर रोडवरील राणाप्रताप नगर आणि नम्रता नगर येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका मेनका राठोड, दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष , महेश देवकर, शिवराज सरतापे बाबुराव घुगे आनंद बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. देशमुख यांनी सर्वांनी वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, प्रत्येकाच्या घरासमोर झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. यावेळी परिसरातील लोकांना एनर्जी ज्युसचे वाटपही करण्यात आले. यावेळी , गोपाळ चालवदि, गणेश मराठे ,महेश काशीद , ठाकूर ,खुलपे सर ,मयुर घुगे,वैजनाथ कुलकर्णी , अनुराग पनशेट्टी व नागरिक उपस्थित होते.