सोलापूर : ‘प्रिसिजन ‘मध्ये आज गणराया आणि मारुतीरायाचं आगमन झालं आहे. चिंचोळी प्लांटच्या गेट क्रमांक दोनजवळ नुकतंच एक छानसं छोटेखानी मंदिर उभारलं आहे. त्या मंदिरात विधिवत दोन्ही देवांची प्रतिष्ठापना झाली. इतक्या सुबक ‘मकराना’ संगमरवरी मूर्ती आहेत की वर्णन केवळ अशक्य ! अजमेरजवळच्या किशनगढ भागातील अंबाजी ते अरवली हा पट्टा ‘मकराना’ नावाच्या सुरेख संगमरवरासाठी प्रसिद्ध आहे.
वॉटर टेस्टसहित अनेक कठीण चाचण्यांमधून हे संगमरवर तावून सुलाखून निघतं. प्रिसिजन परिवाराचे घनिष्ट मित्र असणारे मा. शील सडवेलकर आणि प्रा. दवे यांनी खास जयपूरहून या मूर्ती उपलब्ध करून दिल्या. ‘प्रिसिजन’मधलं रोजचं वातावरण खूप आल्हाददायक असतं. या मंदिरामुळं ते मंगलमयही झालं आहे. गेट क्रमांक दोनमधून आमचे शेकडो कर्मचारी रोज ये-जा करतात. आमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट आता अधिक प्रसन्न चित्तानं होणार आहे.