कामात कुचराई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा
सोलापूर – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शंभर दिवसाचे उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करा अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज केले जिल्हा परिषदेमध्ये आज स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जलजीवन मिशन व पाणी गुणवत्ता या तीन विभागाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधीक्षक सचिन सोनकांबळे, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, सहाय्यक लेखाधिकारी प्रकाश शेंडगे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, क्षमता बांधणी सल्लागार शंकर बंडगर, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, सांडपाणी व्यवस्थापन सल्लागार प्रशांत दबडे, अभियंता योगेश कुंभार, अल्फिया अब्जुमिय्या बिराजदार, आनंद मोची उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये गावे ओडिएफ प्लस मॉडेल गावे जाहीर करण्यासाठी गावात वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, प्रत्येक घरासाठी परसबागा बागा व सांडपाण्यासाठी शोषखड्डा तसेच ओला कचरा व सुका कचरा यासाठी डस्टबिन अशा बाबींची वेळेत पूर्तता करणे आवश्यक आहे. स्वच्छ माझे अंगण या उपक्रमाची प्रभावी अंमल बजावणी करा. तरच गाव ओडिएफ मॉडेल होणेस मदत होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायत मध्ये 100 दिवसाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत वैयक्तिक शौचालय चे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे जे लाभार्थी ऑनलाईन मागणी करतात त्यांना वेळेत त्यांच्या नावाची नोंद घेण्याच्या सूचना सिईओ कुलदिप जंगम यांनी दिले.
शंभर दिवसाचे उपक्रम अंतर्गत देण्यात आलेली उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी संबंधित ग्रामसेवक यांना ग्रामपंचायती उद्दिष्ट निश्चित करण्यात यावे. कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या घटकाची कामे करणे शिल्लक आहेत याचा तपशील उपांगनिहाय पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना उपलब्ध करून देण्याचे सूचना सिईओ जंगम यांनी दिल्या
येत्या 22 जानेवारी रोजी आढावा बैठक
……………………………….
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, १५ वा वित्त आयोग अंतर्गत डस्टबीन , कचरा वहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय व सिटीझन आॅप्लिकेशन अंतर्गत लाभार्थ्यी बाबत आढावा घेणे साठी उप अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, बीआरसी व सीआरसी यांची आढावा बैठकीचे आयोजन करणेत आले आहे. असल्याची माहिती सिईओ कुलदिप जंगम यांनी दिली. जे अधिकारी कर्मचारी या कामात कुचराई करतील त्यांचेवर कारवाई प्रस्तावित करा अशा स्पष्ट सुचना सिईओ कुलदिप जंगम यांनी दिले.
सांगोला व अक्कलकोट आकांक्षित तालुक्यांवर लक्ष द्या
…………………
केंद्र शासनाचे विशेष अभियानात असलेल्या सांगोला व अक्कलकोट आकांक्षित तालुक्यांवर लक्ष द्या. या तालुक्यातील कामे वेळेत पुर्ण होतील याची दक्षता घ्या. सर्व विभागांनी या तालुक्यातील कामे वेळेत पुर्ण होतील याची काळजी घ्या अशा सुचना सिईओ कुलदिप जंगम यांनी दिल्या.
मुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देशानुसार १०० दिवसाचे प्रमाणे उदिष्ठ्य
वैयक्तिक शौचालय – 3892
घनकचरा व्यवस्थापन ग्राप – 284
सांडपाणी व्यवस्थापन- 372
गोबरधन – 1 युनिट
प्लास्टिक व्यवस्थापन – 7 युनिट
ओडिएफ प्लस गावे- 289 गावे