सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या अंत्यविधीला झालेल्या गर्दीचा चोरट्यांनी चांगलाच फायदा घेतला. फौजदार चावडी हद्दीमध्ये दमानी नगर येथे राहणाऱ्या रणजीत कोकाटे यांचा 30000 चा मोबाईल चोरीला गेला असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस चौकी मध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
लक्ष्मीकांत सरगम यांचा 25000 चा तर श्रीहरी गुर्रम यांचा 8000 चा मोबाईल महेश कुठे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी चोरीला गेला अशा फिर्यादी दाखल झाले आहेत. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, रोख रक्कम तसेच महिलांच्या गळ्यातील सोने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या गड्डा यात्रा सुरू असून त्या ठिकाणी देखील दररोज अशा चोरीच्या घटना घडत आहेत.