गेले पन्नास वर्षापासूनची परंपरा आजही सोलापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद
सोलापूर : येथील सुप्रसिद्ध अशा राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या तांदूळ महोत्सवाला सुरुवात झाली. शंभर प्रकारचे तांदूळ एकाच छता खाली पाहायला मिळतील. व हा महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील असे उद्घाटक श्री लक्ष्मीचंद कुंदनलाल अग्रवाल यांनी सांगितले.
चांदणी चौक, महापौर बंगला च्या पाठीमागे असलेल्या सुप्रसिद्ध अशा अग्रवाल बंधू यांच्या तांदूळ महोत्सवाला सुरुवात झाली. या कौटुंबिक सोहळ्यावेळी सतीश अग्रवाल, दिनेश अग्रवाल, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. सौरभ अग्रवाल, ॲड.सुभाष अग्रवाल, डॉ. हिरालाल अग्रवाल, रतनलाल अग्रवाल, अशोक अग्रवाल, संतोष राघोजी, सर्व अग्रवाल स्टाफ व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिनेश अग्रवाल म्हणाले की या तांदूळ महोत्सवात बासमती तांदूळ,अख्खा तिबार, मिनी दुबार, असे प्रकार पाहायला मिळतील. तसेच मोगरा, मिनी मोगरा, आंबेमोहर, चिन्नुर, मोहन – मलाई कालीमुच, कोलम, एच. एम.टी. सोना मसूरी, स्वस्तिक, हंसा, इंद्रायणी, बॉईल्ड् राईस, तसेच हॉटेल साठी लागणारा जो खास लांब दाण्याचा सुवासिक तांदूळ असतो ते देखील या प्रदर्शनात पाहायला मिळेल. असे त्यांनी सांगितले.
या पहा आणि खरेदी करा असे आवाहन करीत अग्रवाल बंधू यांनी या प्रदर्शनाला सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावे असे सांगितले या कार्यक्रमाची प्रस्तावना अग्रवाल राईस मर्चंटचे दिनेश अग्रवाल यांनी केले तर आभार सतीश अग्रवाल यांनी मानले.