पद्मविभूषण पंडित जसराज यांचं न्यूज जर्सी येथे निधन झालं आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.